शिक्षिका अनिता तांबे यांचा 'अहिल्यारत्न पुरस्कार' देऊन गौरव !

                       पुरंदर रिपोर्टर Live 

भोर : प्रतिनिधि 

                  भोर येथील जिजामाता प्राथमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या अनिता अशोकराव तांबे (लकडे) यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल 'अहिल्यारत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला.


हा पुरस्कार अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात, माजी आमदार रामहरी रुपनवर व ऑल इंडिया धनगर महासंघ दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


अनिता तांबे या मूळच्या नीरा (पोकळेवस्ती) येथील असून, अशोक सुभानजी लकडे यांची कन्या आणि फलटण तालुक्यातील ढवळ गावची सून आहेत. त्या गेल्या अनेक वर्षांपासून भोर परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पितपणे कार्य करत असून, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक व सामाजिक मूल्यांची जोपासना करणाऱ्या उपक्रमात त्या आघाडीवर आहेत.


पुरस्काराने संपूर्ण लकडे व तांबे कुटुंबीयांचाच नव्हे तर नीरा, ढवळ आणि भोर परिसराचाही अभिमान वाढवला आहे. समाजोपयोगी आणि प्रेरणादायी कार्याबद्दल अनिता तांबे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments